जैन धर्मियांचं पर्यूषण, त्यावर रंगलं `राज`कारण !

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, September 4, 2013 - 20:25

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जैन धर्मियांच्या पर्यूषण पर्व काळात तब्बल चार दिवस कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. त्यामुळे मांसाहारप्रेमी नागरिकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त केली जातेय. राज ठाकरेंनी यावर मुंबई मनपाला खडे बोल सुनावत मांसाहारींची बाजू घेतली आहे.
जैनांच्या पर्यूषण पर्व काळात 2 सप्टेंबर, 6 सप्टेंबर, 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर असे चार दिवस देवनार पशुवधगृह पशुवधासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यादिवशी शहरातही मांसविक्री केली जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केलेय. पर्यूषण पर्व काळात 9 दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात व राजस्थान सरकारला दिलेत. त्यानुसार मुंबईतही या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जैन संघटनांनी केली होती.
त्यानुसार चार दिवस मांसविक्री बंद ठेवण्यात आली असली तरी त्यामुळे मांसाहारी लोकांमधून तिखट प्रतिक्रिया व्यक्त होतेय. अशा गोष्टींमध्ये मुंबई मनपाने पडू नये असा टोला राज ठाकरेंनी सीताराम कुंटेंना लगावला आहे. मांसाहार विक्रीची दुकानं बंद करणं हा मराठी माणसावर अन्याय असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013 - 19:06
comments powered by Disqus