'हॅपी वुमेन डे' आणि राज ठाकरेंची खंत

भारतात निर्भया बलात्कारासारखे प्रकार होतात. मात्र तरीही आपण हॅपी वुमेन डे म्हणतो ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलीय. 

Updated: Mar 9, 2015, 09:54 AM IST
'हॅपी वुमेन डे' आणि राज ठाकरेंची खंत title=

मुंबई : भारतात निर्भया बलात्कारासारखे प्रकार होतात. मात्र तरीही आपण हॅपी वुमेन डे म्हणतो ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलीय. 

जागतिक महिला दिनानिमित्तानं उत्तर मुंबईतल्या गोरेगावमध्ये मनसे महिला आघाडीतर्फे, महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. त्यात ते बोलत होते. 

यावेळी फिरत्या महिला स्वच्छतागृहांचं वाटप करण्यात आलं. राईट टू पी सारखी चळवळ चालवायला लागणं हे दुर्दैवं असल्याचं त्यांनी सांगितलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.