लॉन्च करायला अमित काय रॉकेट आहे का- राज ठाकरे

अमितला लॉन्च करायला तो काय रॉकेट आहे का, असा खास ठाकरी शैलीत प्रश्न विचारून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांचा राजकारणात प्रवेशांच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. योग्य वेळ आली तेव्हा अमितला मी राजकारणात आणेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

Updated: Jul 11, 2014, 05:12 PM IST
लॉन्च करायला अमित काय रॉकेट आहे का- राज ठाकरे title=

मुंबई : अमितला लॉन्च करायला तो काय रॉकेट आहे का, असा खास ठाकरी शैलीत प्रश्न विचारून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांचा राजकारणात प्रवेशांच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. योग्य वेळ आली तेव्हा अमितला मी राजकारणात आणेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

माटुंगा येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जाहीर मेळावा झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनविसेचे प्रमुख आदित्य शिरोडकर उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरे प्रेक्षकांमध्ये बसला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी चर्चांना पूर्णविराम दिला. 

पक्षात पुन्हा चैतन्य आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपला मुलगा अमित याला राजकारणाच्या मैदानात उतरवण्याच्या विचारात आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती.  

मी केवळ प्रेक्षक

मनविसेच्या मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचे अमित याने मान्य केले आहे. मात्र, मी तिथे केवळ एक प्रेक्षक आणि श्रोता म्हणून जाणार आहे. त्या पलीकडे माझी कुठलीही भूमिका नसेल. मी नुकतीच पदवी घेतली आहे आणि मला उच्च शिक्षणही पूर्ण करायचे आहे,' असे त्याने सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.