...म्हणून प्रचारात उतरायला राज ठाकरेंना उशीर!

मुंबई, पुणे, नाशिक या महानगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र 14 फेब्रुवारीपर्यंत प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब होते... त्यांच्या सभेसाठी मनसे कार्यकर्ते आतूर होते... पण, कुठे होते या दरम्यान राज ठाकरे? का उशीर झाला त्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी? याचं उत्तर खुद्द राज ठाकरे यांनी आज विक्रोळीत झालेल्या जाहीर सभेत दिलंय. 

Updated: Feb 14, 2017, 08:33 PM IST
...म्हणून प्रचारात उतरायला राज ठाकरेंना उशीर! title=

मुंबई : मुंबई, पुणे, नाशिक या महानगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र 14 फेब्रुवारीपर्यंत प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब होते... त्यांच्या सभेसाठी मनसे कार्यकर्ते आतूर होते... पण, कुठे होते या दरम्यान राज ठाकरे? का उशीर झाला त्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी? याचं उत्तर खुद्द राज ठाकरे यांनी आज विक्रोळीत झालेल्या जाहीर सभेत दिलंय. 

'माझा मुलगा अमित हॉस्पिटलमध्ये होता म्हणून मला प्रचारात उतरता आलं नाही. पण आता तो ठीक आहे' असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 'अमित आजारी असल्यामुळे मी प्रचाराला उतरू शकत नव्हतो पण तरीही उमेदवारांनी जोरात प्रचार सुरु ठेवला, याबद्दल त्यांचे अभिनदंन' असं म्हणत त्यांनी आपल्या उमेदवारांचं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचाही प्रयत्न केला. 

दरम्यान, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे देखील प्रचाराच्या रणधुमाळीत सामील झालाय. फेसबुक या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होत अमित ठाकरे यांनी आपल्या वडिलांना साथ दिलीय.