राज ठाकरे- सलमान खान एकाच व्यासपिठावर

मुंबईतल्या माहिममध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोळी महोत्सवाचं आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. मनसे महोत्सवाला अभिनेता सलमान खान यांने खास उपस्थिती लावत चाहत्यांशी संवाद साधल.

सुरेंद्र गांगण | Updated: Nov 22, 2013, 11:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या माहिममध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोळी महोत्सवाचं आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. मनसे महोत्सवाला अभिनेता सलमान खान यांने खास उपस्थिती लावत चाहत्यांशी संवाद साधल.
राज ठाकरे यांच्या आधी सलमान खान यांने चाहत्यांशी संवाद साधला. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपले दोन शब्द सांगितले. सलमानचे वडील माझे गुरू आहेत. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली आहे. त्यांचे मला नेहमी मार्गदर्शन होते, असे राज यांनी सांगितले. तर आपण इथं आलो ते नाते जुने असल्याचे सलमान म्हणाला. यावेळी सलमानने माहिम परिसराची आपल्या आठवणींना उजाळा दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित कोळी महोत्सवाला अभिनेता सलमान खान उपस्थित राहल्याने चाहत्यांमध्ये आनंद ओसंडून वाहत होता. या कोळी महोत्सव २४ नोव्हेंबरदरम्यानअसणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ