राज ठाकरेंनी काढला शरद पवारांना चिमटा

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय बोलतात ते सात आठ महिन्यांनंतर कळतं, ते नेमके काय बोलतील याचा नेम नाही असा चिमटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 14, 2013, 02:01 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय बोलतात ते सात आठ महिन्यांनंतर कळतं, ते नेमके काय बोलतील याचा नेम नाही असा चिमटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढला.
मुंबई बँकेच्या संचालक मंडळात सर्व पक्षाचे लोक आहेत, तरीही बँक चालते, पण सरकार चालत नाही अशा शब्दात आज राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावला. सध्या सरकार आणि महापालिका कॉन्ट्रक्टर्स चालवतायत. सत्ताधारी, प्रशासन, कंत्राटदार यांची मिलीभगत आहे.
राज यांनी आज सकाळी मुंबई बँकेच्या मुख्यालयाला भेट दिली. त्य़ावेळी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होतं. रिक्षा टँक्सीची परमीट मराठी मुलांनाच मिळावीत अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, नाशिकच्या खड्ड्यांना मी जबाबदार नाही, तसंच याआधीचे खड्डे आणि रस्त्यांचं खापर माझ्यावर फोडू नका असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. नाशिकमध्ये सध्या चांगल्या रस्त्यांसाठी कंत्राटं निघतायत. लवकरच नाशिककरांना चांगले रस्ते दिसतील असं आश्वासनही त्यांनी दिलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close