राज ठाकरेंनी घेतली बाळासाहेबांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीकडे येथे आज सुमारे दीड तास भेट घेतली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 26, 2012, 02:08 PM IST

www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी सुमारे दीड तास भेट घेतली. राज ठाकरे आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी दाखल झाले.
दसऱ्या मेळाव्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी मी थकलो आहे. तुम्ही एकदा येऊन पाहा, तुमच्या शिवसेनाप्रमुखाची काय हालत झाली आहे, असे भावनिक भाषण बाळासाहेबांनी केले. यावेळी बाळासाहेबांची प्रकृती खराब असल्याचे जाणवत होते. त्यामुळेच बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांनी कौटुंबिक भेट घेतली.