xxx अबू आझमी निवडून येतोच कसा? - राज

भाषणामध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा खास ‘ठाकरी’ शैलीत लोकांसमोर मांडला. अर्थातच टार्गेट होतं... अबू आझमी.

www.24taas.com, मुंबई
मुंबईत सीएसटीवर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निघालेला मनसे मोर्चानं एकाच वेळेस बऱ्याच गोष्टी एकत्रित साध्य केल्यात. यावेळी केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा खास ‘ठाकरी’ शैलीत लोकांसमोर मांडला. अर्थातच टार्गेट होतं... अबू आझमी.
‘मुंबईत सीएसटीवर हिंसाचार घडवून आणणाऱ्या रझा अकादमीनंच भिवंडीतही मोर्चा काढला होता. याच सभेत xxx अबू आझमीनं भडकाऊ भाषण केलं होतं. त्यानंतर घडलेल्या हिंसाचार दोन पोलिसांना जणांना अत्यंत क्रूर पद्धतीनं मारून आगीत फेकून दिलं... अबू आझमीची मदत त्या मुस्लिम मृत तरुणालाच का? आमच्या पोलिसांना का नाही?’ असं म्हणत राज ठाकरेंनी अबू आझमींवर टीकास्त्र सोडलं.
‘इतकं सगळ माहित असूनही अबू आझमी निवडून येतोच कसा... कारण त्याला निवडून देणारे सगळे राज्याच्या बाहेरून आलेले लोक आहेत. मुंबईमध्ये हेतू पुरस्सर घडवून आणलेल्या हिंसाचाराही राज्याच्या बाहेरच्यांनीच घडवून आणलाय.’ असं सांगत मनसेचा नेहमीचाच परप्रांतियांचा मुद्दा यावेळी राज ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीनं जनसमुदायासमोर मांडला.

‘आर.आर.पाटलांना अबू आझमीला नाही अडवता आलं आणि मला सांगतायत... आम्ही शांततेनं मोर्चा काढूनही आम्हाला अडवतात. आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही. आम्ही इथं आलोत ते त्या दिवशी छेडछाडीला बळी पडलेल्या महिला पोलीस भगिणींसाठी... पोलिसांना आणि पत्रकारांना मनौधैर्य देण्यासाठी... त्यांना पाठिंबा देण्यासाठी... आम्ही फक्त समजतो तो महाराष्ट्र धर्म.. त्याच्या वाटेला कुणी जायचं नाही’, असं म्हणत राज ठाकरेंनी या भाषणात फक्त तरुणांचंच नाही तर महिला आणि पोलिसांचंही मन जिंकलं.