राजनाथ सिंह उद्धव ठाकरेंच्या भेटीला

राजनाथ सिंहांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची रात्री उशिरा भेट घेतली. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 18, 2013, 11:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राजनाथ सिंहांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची रात्री उशिरा भेट घेतली. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली.
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही यावेळी उपस्थित होते. अडवाणींचा नाराजीनामा आणि जेडीय़ुनं तोडलेली युती या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली जात होती.
पण उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं राजनाथ सिंहांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.