लालबाग मंडळाला राकेश मारियांचा इशारा

मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी लालबागचा राजा गणपती मंडळाला कडक असा इशारा दिलाय. लालबागचा राजा मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही भाविकांशी किंवा पोलीसांशी गैरवर्तणूक केली तर, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी लालबागचा राजा गणपती मंडळाला दिला आहे. 

Updated: Aug 29, 2014, 09:22 AM IST
 लालबाग मंडळाला राकेश मारियांचा इशारा

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी लालबागचा राजा गणपती मंडळाला कडक असा इशारा दिलाय. लालबागचा राजा मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही भाविकांशी किंवा पोलीसांशी गैरवर्तणूक केली तर, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी लालबागचा राजा गणपती मंडळाला दिला आहे. 

गेल्या वर्षी लालबागचा राजा मित्र मंडळातील कार्यकत्यांनी एका महिला पोलीस कर्मचारीला मारहाण केली होती. त्याचबरोबर राजाचं दर्शन घ्यायला येणा-या भाविकांबरोबर मग ती महिला असो की, पुरुष लालबागचे कार्यकर्ते शरीराला कुठेही धरून ढकलायचे. 

अनेक भाविकांबरोबर लालबागच्या कार्यकर्त्यांनी भाडणं केले होते. हा प्रकार गेली अनेक वर्षे सुरु असून, त्याची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी लालबाचा राजा मंडळाला तंबीच दिलीय. त्यामुळे य़ंदा तरी लालबागचा राजाचे कार्यकर्ते राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांशी नीट वर्तणूक करतील.

झी मीडीयानं लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गैरवर्तणुकी विरोधात आवाज उठवला होता. त्यावर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी लालबागचा राजा मंडळातील सर्व 11 दिवासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासाण्याचे आदेश दिले होते. पण, पुढे काहीच झालं नाही. 

आता नवीन पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी लालबागचा राजा मंडळाला दिलेला कारवाईचा इशारा नक्कीच पाळला जाईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.