राकेश रोशन यांच्याकडून शहीद इवलेकरांच्या कुटुंबियांना मदत

अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कमधील आग विझवतांना शहीद झालेल्या नितीन इवलेकरांच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत मिळाली आहे. ही मदत सरकारी नाही, तर अभिनेता हृतिक रोशनचे वडील आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ही मदत जाहीर केलीय.

Updated: Jul 21, 2014, 12:13 PM IST
राकेश रोशन यांच्याकडून शहीद इवलेकरांच्या कुटुंबियांना मदत title=

मुंबई : अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कमधील आग विझवतांना शहीद झालेल्या नितीन इवलेकरांच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत मिळाली आहे. ही मदत सरकारी नाही, तर अभिनेता हृतिक रोशनचे वडील आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ही मदत जाहीर केलीय.

ही रक्कम इवलेकरांच्या मुलींच्या नावे करण्यात येणार आहे. हृतिक रोशनने काल ट्विटरच्या माध्यमातून शहीद इवलेकरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले, त्यानंतर फराह खान आणि इतर बॉलिवूडमंडळींनीही मदत देऊ केली. 
  
लोटस बिझनेस पार्क इमारतीमधील तीन मजले हे हृतिक आणि राकेश रोशन यांचे आहेत, लोटस पार्कच्या दोन मजल्यांना आग लागली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.