पोकेमॉन गेमच्या समर्थनासाठी मुंबईत रॅली

अवघ्या जगभरात धुमाकूळ घातलेला पोकेमॅनची लोकप्रियता भारतातही वाढू लागलीय. 

Updated: Jul 24, 2016, 08:29 AM IST
पोकेमॉन गेमच्या समर्थनासाठी मुंबईत रॅली title=

मुंबई : अवघ्या जगभरात धुमाकूळ घातलेला पोकेमॅनची लोकप्रियता भारतातही वाढू लागलीय. 

भारतात अधिकृतपणे हा गेम लॉन्च करण्यात आला नसली तरी या गेमच्या पायरेटेड कॉपीचा वापर आपल्याकडे वाढतोय. या गेमची नशा लहान मुलांपासून ते तरूणवर्गापर्यंत पोहोचलीय. 

मात्र, आता या गेमवरून मतमतांतरे सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे या गेमच्या समर्थनासाठी मुंबईतल्या चर्चगेट परिसरात एक रॅलीही काढण्यात आलीय.