शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंचं शक्तीप्रदर्शन

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतल्या प्रचाराचा भाग म्हणून, काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी 'मातोश्री'च्या अंगणात म्हणजेच कलानगर भागात रॅली घेत शक्तीप्रदर्शन केलं. 

Updated: Apr 2, 2015, 03:00 PM IST
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंचं शक्तीप्रदर्शन title=

मुंबई: वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतल्या प्रचाराचा भाग म्हणून, काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी 'मातोश्री'च्या अंगणात म्हणजेच कलानगर भागात रॅली घेत शक्तीप्रदर्शन केलं. 

यावेळी राणेंचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे, तसंच कालिदास कोळंबकर हे सुद्धा या रॅलीत सहभागी झाले होते. 

शिवसेनेचा मानबिंदू असलेल्या थेट मातोश्री भागातच, नारायण राणे यांची ही रॅली राणेंची शिवसेना बालेकिल्ल्याला धडक अशाच रुपात पाहिली गेली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.