बहिणीबरोबर सुल्तान पाहायला गेली आणि...

कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच विरारमध्ये दोन नराधमांनी १६ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीये. 

Updated: Jul 25, 2016, 09:49 AM IST
बहिणीबरोबर सुल्तान पाहायला गेली आणि... title=

मुंबई : कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच विरारमध्ये दोन नराधमांनी १६ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीये. 

या प्रकरणी त्या दोनही तरुणांना अटक करण्यात आलीये. दीपक मिश्रा आणि सूरज दौलतानी अशी आरोपी तरुणांची नावे आहेत. 

पीडित मुलगी विरार येथे आपल्या बहिणीसोबत सुल्तान पाहायला गेली होती. यावेळी पीडितेची बहिण तिच्या मित्रासोबत शॉपिंग करायला गेली. याचदरम्यान तिच्या मोबाईलवर एकाने कॉल करुन आपण बहिणीचा मित्र असल्याचे सांगितले. तिला त्यांनी नालासोपारा स्टेशनजवळ बोलावले. तेथून तिला लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. 

तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारु अशी धमकीही दिली. दरम्यान, पीडित तरुणीने घडलेला प्रकार तिच्या मित्रांना सांगितल्यानंतर तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर दोनही आरोपींना अटक कऱण्यात आलीये.