धक्कादायक गोवंडीत भाचीवर मामाचा बलात्कार

घरात कोणी नसल्याची संधी साधत चुलत मामानंच 14 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे. मुलगी गरोदर राहिल्यानं हा गुन्हा उघड झाला असून आरोपी मामाविरोधात शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

Updated: Aug 3, 2014, 03:49 PM IST
धक्कादायक गोवंडीत भाचीवर मामाचा बलात्कार title=

मुंबई : घरात कोणी नसल्याची संधी साधत चुलत मामानंच 14 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे. मुलगी गरोदर राहिल्यानं हा गुन्हा उघड झाला असून आरोपी मामाविरोधात शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. याच घरात आरोपी भाळू प्रजापती (25) हाही राहात होता. मुलीच्या आई-वडीलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असल्याने दिवसभर दोघंही घराबाहेर असायचे. ही संधी साधत आरोपीनं अनेकदा या मुलीचा विनयभंग केला होता. 

सात महिन्यांपूर्वी त्यानं तिच्यावर बलात्कार केला. शिवाय तिला जिवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलीनं ही बाब सांगितली नाही. मात्र शुक्रवारी रात्री अचानक या मुलीच्या पोटात दुखू लागलं. तेव्हा ती गरोदर असल्याचं स्पष्ट झालं. पालकांनी चौकशी केली असता तिनं हा प्रकार सांगितला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.