बाळासाहेबांसारखा नेता होणे नाही- रतन टाटा

टाटा समुहाचे प्रमुख असणाऱ्या रतन टाटांनी नुकतीच निवृत्त स्वीकारली. त्यानंतर त्यांनी काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.

जयवंत पाटील | Updated: Jan 13, 2013, 01:40 PM IST

www.24taas.com, मुंबई
टाटा समुहाचे प्रमुख असणाऱ्या रतन टाटांनी नुकतीच निवृत्त स्वीकारली. त्यानंतर त्यांनी काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.
यावेळी रतन टाटा यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. बाळासाहेब हे थोर नेते होते. त्यांच्यासारखा नेता होणे नाही, असं ते म्हणाले. तसंच बाळासाहेबांच्या निधनाने आपल्याला दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलं. बाळासाहेबांच्या जाण्यामुळे समाजाचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे असं टाटा म्हणाले.बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई आणि महाराष्ट्रावर उमटवलेला ठसा कधीच पुसला जाणार नाही, असं टाटांनी यावेळी म्हटलं.
रतन टाटा यांनी दोन महिन्यांपूर्वी बाळासाहेबांची भेट घेतली होती. मात्र जेव्हा बाळासाहेबांचं जेव्हा निधन झालं, तेव्हा रतन टाटा मुंबईबाहेर होते. त्यामुळे वेळ मिळताच रतन टाटांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.