कटू सत्यः बॅटने खेळणाऱ्यांना १ कोटी, जीवाशी खेळणाऱ्यांना नाही!

By Prashant Jadhav | Last Updated: Wednesday, June 26, 2013 - 14:52

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतात क्रिकेटला लष्कराच्या जवानापेक्षा अधिक महत्व असल्याचे उत्तराखंड येथील महापुरातील बचाव कार्यानंतर दिसून आले. यासंदर्भात एक मेसेज सध्या फेसबुक, ट्विटर, ब्लॅक बेरी मेसेंजर, जी टॉक, आणि वॉट्स अपच्या माध्यमातून फिरत आहे.
हा मेसेज खूपच हेलावणारा आणि सरकारच्या सणसणीत कानाखाली देणार आहे.....

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या एका मुलीने घरी फोन लावून आईला विचारले ,
"आई रेडीओवर ऐकले क्रिकेटमध्ये भारत जिंकला आणि प्रत्येक खेळाडूला १ कोटी रु मिळाले "
आई - होय, बाळ सरकार म्हणतेय ते देशासाठी खेळलेत म्हणून …
मुलीने आकाशात हेलिकॉप्टरला लटकलेल्या जवानाकडे पहात आईला विचारले,
आई यांना पण मिळेल का ग १ करोड रुपये …
आई - नाही बाळ आपल्या येथे बॅटने खेळणाऱ्यांना बक्षीस मिळते जीवाशी खेळणाऱ्यांना नाही

आता भारत सरकार हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना काय मदत देतं याकडे साऱ्या भारताचं लक्ष लागून राहिले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Wednesday, June 26, 2013 - 14:52


comments powered by Disqus