बंडखोर उमेदवाराची घरवापसी, मुंबई पालिकेत शिवसेनेची एक जागा वाढणार

महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून निवडून आलेल्या स्नेहल मोरे आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 24, 2017, 12:05 PM IST
बंडखोर उमेदवाराची घरवापसी, मुंबई पालिकेत शिवसेनेची एक जागा वाढणार title=

मुंबई : महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून निवडून आलेल्या स्नेहल मोरे आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता त्या शिवसेनेत प्रवेश करतील. शिवसेनेतून बडतर्फ केलेले माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे यांच्या स्नेहल मोरे वहिणी आहेत. 

शिवसेनेकडून तिकिट न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी केली. त्याचा फटका शिवसेनेला बसला. तर काहींनी अन्य दुसऱ्या पक्षात जाऊन नशिब अजमावले. काहींना लॉटरी लागली तर काहींना मतदारांनी नाकारल्याने त्यांना घरीच बसावे लागले आहे. मुंबई पालिकेत 84 शिवसेना तर भाजपने 82 जागा पटकावल्या आहेत. 114 हा जादुई अकडा गाठण्यासाठी आता कसरत करावी लागणार आहे.