मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

मध्य रेल्वेची सकाळी विस्कळीत झालेली वाहतूक हळहळू पूर्वपदावर येत आहे. ही वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

Updated: Sep 2, 2014, 12:57 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर title=

मुंबई : मध्य रेल्वेची सकाळी विस्कळीत झालेली वाहतूक हळहळू पूर्वपदावर येत आहे. ही वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

मुलुंड ते घाटकोपर दरम्यान धिम्या मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने सकाळी प्रवाशांचा खोळंबा झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल झालेत. सकाळी ११च्या सुमारास दुरुस्तीचे काम झाल्यावर सुमारे सव्वा अकराच्या सुमारास या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू झाली. 

ऐन सकाळच्यावेळी लोकलसेवा ठप्प झाल्याने मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे तसेच ठाणे, कल्याणच्या दिशेने जाणा-या धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. 

वाहतूक विस्कळीत झाल्याने ऐन पावसातच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बेस्ट प्रशासनाकडे अतिरिक्त बस सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार या मार्गावर काही जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.