मवाळ झालेल्या राणेंना मुख्यमंत्र्यांचा टोमणा

Last Updated: Saturday, August 9, 2014 - 14:38
मवाळ झालेल्या राणेंना मुख्यमंत्र्यांचा टोमणा

मुंबई: मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागणारे आणि नंतर सपशेल माघार घेणारे नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकाद डिवचलंय. विधानसभा निवडणूकीत काँग्रेची उमेदवारी नाती-गोती पाहून नव्हे तर निवडून येण्याच्या क्षमतेवरच दिली जाईल असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय. 

बंडाची तलवार म्यान करताना राणेंनी विधानसभा निवडणुकीत मुलगा नितेश राणे यांना तिकीट मिळेल असं आश्वासन मिळवल्याची चर्चा आहे. याविषयी पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी नाव नं घेता राणेंना टोमणा लगावला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे कान टोचले असल्याची चर्चा आहे. राणेंनी आपल्या मुलाला कणकवलीमधून निवडणूक लढवण्यास मिळावी अशी मनीषा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्याप्रमाणेच सुशीलकुमार शिंदे यांनीही त्यांच्या मुलीसाठी विधानसभा तिकिटाची अपेक्षा व्यक्त केली होती. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी मात्र थेट नाव न घेता राणे आणि शिंदे यांना टोला लगावला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट वाटप नातीगोती बघून होणार नाही. काँग्रेसचा विचार असलेल्या, चांगलं काम असलेल्या आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच तिकिट देण्यात येईल असं चव्हाण म्हणाले. हा राणे आणि शिंदे यांना धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Saturday, August 9, 2014 - 14:38
comments powered by Disqus