व्यंगचित्र प्रकरणी राजीनामा की स्टंटबाजी?

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकाकडून तसेच शिवसेनेच्या नेतृत्वाकडून अजूनही माफी मागितली जात नसल्याने, बुलडाण्यातील 1 खासदार आणि 2 आमदारांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

Updated: Sep 27, 2016, 10:42 PM IST
व्यंगचित्र प्रकरणी राजीनामा की स्टंटबाजी? title=

मुंबई : व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकाकडून तसेच शिवसेनेच्या नेतृत्वाकडून अजूनही माफी मागितली जात नसल्याने, बुलडाण्यातील 1 खासदार आणि 2 आमदारांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

व्यंगचित्र प्रकरणी राजीनामा दिल्याचं वृत्ताचं शिवसेनेने मात्र खंडन केलं आहे. शिवसेनेकडे अद्याप कुणाचाही राजीनामा नसल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.

यावरून व्यंगचित्र प्रकरणी राजीनामा ही राजकीय स्टंटबाजी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपलं राजकीय भवितव्याचा विचार करून हे प्रथमदर्शनी राजीनामे असल्याचीही चर्चा आहे. कारण मराठा बहुल मतदारंसंघात नाराजी ओढवल्यास आमदारकी, खासदारकीला सुरूंग लागू शकतो अशी चर्चा आहे.