"सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही", असं उत्तर महाराष्ट्र सदन प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवर दिलं आहे. या प्रकरणात माजी मंत्री छगन भुजबळ अडचणीत आले आहेत. आपल्यावरील कारवाई ही व्यक्तीगत आकस ठेऊन केली गेल्याचं गाऱ्हाण, छगन भुजबळांनी शरद पवारांकडे मांडलं होतं, त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Updated: Jun 18, 2015, 07:36 PM IST
"सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही" title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही", असं उत्तर महाराष्ट्र सदन प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवर दिलं आहे. या प्रकरणात माजी मंत्री छगन भुजबळ अडचणीत आले आहेत. आपल्यावरील कारवाई ही व्यक्तीगत आकस ठेऊन केली गेल्याचं गाऱ्हाण, छगन भुजबळांनी शरद पवारांकडे मांडलं होतं, त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

"सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही, पूर्णपणे व्यक्तीनिरपेक्ष आणि कोणताही आकस न ठेवता, आम्ही काम करतो असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

भुजबळ यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना ही कारवाई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होत असून, त्यात सरकार कोणताही हस्तक्षेप करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राजकीय बेरीज वजाबाकी करण्यासाठी आमचे सरकार सरकारी यंत्रणेचा वापर कधीही करणार नाही. काही विशिष्ठ तक्रारी असतील, तर शासन नियमानुसार कारवाई करणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. मात्र, आम्ही सूडबुद्धीने कोणतीही कारवाई करीत नाही आणि आमची तशी प्रथा नाही ,असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.