रिक्षा, टॅक्सींचा प्रस्तावित संप मागे

 मुंबईकरांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. मुंबईकरांचा आजचा सोमवार सुरळीत पार पडणार आहे. कारण आजचा रिक्षा, टॅक्सी आणि बसेसचा संप मागे घेण्यात आलाय. त्यामुळे आज रिक्षा, टॅक्सी, बसेस रस्त्यावर नेहमीप्रमाणे धावणार आहेत.   

Updated: Aug 29, 2016, 08:30 AM IST
रिक्षा, टॅक्सींचा प्रस्तावित संप मागे title=

मुंबई :  मुंबईकरांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. मुंबईकरांचा आजचा सोमवार सुरळीत पार पडणार आहे. कारण आजचा रिक्षा, टॅक्सी आणि बसेसचा संप मागे घेण्यात आलाय. त्यामुळे आज रिक्षा, टॅक्सी, बसेस रस्त्यावर नेहमीप्रमाणे धावणार आहेत.   

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत रविवारी उशिरा बैठक झाली. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बेकायदेशीर पद्धतीनं मुंबईत चालणाऱ्या ओला आणि उबेर टॅक्सींवर कारवाईच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. 

जय भगवान ऑटो टॅक्सी संघटनेनं या संपाची हाक दिली होती. मात्र रावतेंबरोबर झालेल्या बैठकीनंतर 1 सप्टेंबरपर्यंत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

दरम्यान बेस्ट बसेसचा आजचा प्रस्तावित संप याआधीच मागे घेण्यात आला होता. हा संप मागे घेण्यात आल्यानं मुंबईकरांना तूर्त दिलासा मिळालाय.