मुंबईत महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हल्ला

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, October 17, 2013 - 15:51

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रूपारेल कॉलेजच्या बाहेर एका विद्यार्थिनीवर ब्लेडने हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात त्या मुलीच्या डाव्या हाताला दुखापत झालीय. तिला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हल्ला कोणी आणि कशासाठी केला याचा शोध अजून लागलेला नाही. बीएमएस अभ्यासक्रमाची पहिल्या वर्षाची ही विद्यार्थिनी आहे.
गुरुवारी सकाळी कॉलेजजवळ १९ वर्षीय तरुणीवर ब्लेड हल्ला झाला. झालेल्या या हल्ल्यात तरुणी सुदैवाने बचावली. तिला उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन तिला घरी सोडण्यात आले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओFirst Published: Thursday, October 17, 2013 - 15:47


comments powered by Disqus