मुसलमानांच्या वक्तव्यावर 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. मुसलमानांच्या बाबतीत कोझीकोडमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

Updated: Sep 28, 2016, 12:03 PM IST
मुसलमानांच्या वक्तव्यावर 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र title=

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. मुसलमानांच्या बाबतीत कोझीकोडमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आज अचानक मुस्लीमांची गरज का आली. सरकार बदललं तरी मुसलमानी लांगूलचालनाचे प्रयोग नवे प्रयोग घडतच आहेत. मुसलमानांना मिठ्या मारा असे मोदी यांनी सांगताच त्यांचे शब्द जिभेवर विरघळण्याआधीच मुसलमानी मोर्चाचा बॉम्ब फुटावा हे कसले लक्षण असं सामनामध्ये म्हटलंय.

मुसलमानांना आपलंस करुन मुख्य प्रवाहामध्य़े आणणं ही काळाची गरज आहे. पण त्यासाठी देशातील कायद्याची आणि संस्कृतीची जाणीव करुन देण्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे. मुसलमांनानी वंदे मातरमला विरोध करणं सोडलं पाहिजे. जे मुसलमान वंदे मातरमचा गजर करतील ते आपलेच आहे. देशात असे लाखो मुसलमान आहे ही भाग्याची गोष्ट आहे.

जे काश्मिरात पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावतात त्यांना छातीशी कवटाळून आपलं म्हणायचं का ? मुसलमानांना गाठीशी बांधून राजकारण करण्याची एक नवी पेढी तयार झाली आहे. त्यात राम मंदिराचा कळस उतरला हेच दिसते. अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून मोदींवर टीका करण्यात आली आहे.