संजय घाडी, राजा चौगुले पुन्हा मनसेत

शिवसेनेचे उपनेते संजय घाडी आणि राजा चौगुले यांनी अखेर पुन्हा मनसेत प्रवेश केलाय. आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे दोघे मनसेत डेरेदाखल झाले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 14, 2013, 12:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे उपनेते संजय घाडी आणि राजा चौगुले यांनी अखेर पुन्हा मनसेत प्रवेश केलाय. आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे दोघे मनसेत डेरेदाखल झाले.
शिवसेनेत सन्मानाची वागणूक मिळत नसल्यामुळे ते नाराज होते. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनीही मनसेत प्रवेश केलाय. तसंच विजय फडतरकर, राजीव डायस यांनीही आज मनसेत प्रवेश केलाय. शिवसेनेला यामुळे खिंडार पडायला सुरूवात झाल्याचं म्हटलं जात आहे.
एकेकाळी राज ठाकरेंचे विश्वासू सहकारी असलेले संजय घाडी आणि राजा चौघुले मनसेमध्ये परतल्यामुळे मुंबईत पक्षाची ताकद अधिक वाढणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.