सत्य जाळता येणार नाही- राऊत

By Jaywant Patil | Last Updated: Friday, October 5, 2012 - 21:15

www.24taas.com, मुंबई
शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपात शंभर टक्के तथ्य असल्याचा दावा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
अजित पवार, सुनील तटकरे यांनी आमच्या आरोपांना प्रत्त्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये ते त्यांच्या अंगलट येईल असा इशाराही राऊत यांनी दिलाय. शिवसेना-भाजप युतीनेही राज्य केले आहे. त्यामुळे सिंचनाचा मजला कुठला हे आम्हाला कुणी शिकवू नये. मंत्रालयाच्या आगीत भ्रष्टाचाराचे पुरावे जाळले तरी, सत्य जाळता येणार नाही असा सणसणीत टोलाही राऊत यांनी अजित पवारांना हाणलाय.
अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या टिकेला उत्तर देताना उद्धव यांना जलसंपदा खात्याचं कार्यालय मंत्र्यालयात कोणत्या मजल्यावर आहे ते माहिती आहे का असा खोचक सवाल केला होता.

First Published: Friday, October 5, 2012 - 21:15
comments powered by Disqus