सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांचं निधन

सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचं निधन झालयं. मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या घरी त्याचं निधन झालयं. गेले काही वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते. 

Updated: Aug 7, 2014, 12:50 PM IST
सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांचं निधन title=

मुंबई: सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचं निधन झालयं. मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या घरी त्याचं निधन झालयं. गेले काही वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते. 

ते सारस्वत बँकेचे अध्यक्ष होते. नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगच्या मार्फत त्यांनी हजारो मराठी तरुणांना बँकेत नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन केलं. एक दिलखुलास आणि मनमिळावू असा नेता हरपला अशी प्रतिक्रिया ठाकूर यांच्या निधनानं व्यक्त होतेय.

त्यांच्यावर अनेक संकटं आली, जीवघेणा अपघातही झाला पण जिद्दीनं ठाकूरांनी सगळ्याशी लढा दिला आणि अखेरपर्यंत ते कार्यरत राहिले.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.