सेमी फायनल : मुंबईतील वानखेडे बाहेर तिकिटांचा काळाबाजार

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विरूध्द वेस्ट इंडिज असा रंगतदार सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, या सेमी फायनल सामन्याआधी वानखेडे बाहेर तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे उघड झालेय.

Updated: Mar 30, 2016, 07:56 AM IST
सेमी फायनल : मुंबईतील वानखेडे बाहेर तिकिटांचा काळाबाजार title=

मुंबई : आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विरूध्द वेस्ट इंडिज असा रंगतदार सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, या सेमी फायनल सामन्याआधी वानखेडे बाहेर तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे उघड झालेय.

भारत विरूध्द वेस्ट इंडिज यांच्यातील या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या सामन्याची सर्व तिकीटं विकली गेलीत. त्यामुळेच वानखेडे बाहेर तिकिटांचा काळाबाजार होताना दिसतोय. याच्यापाठिमागे कोण आहे, अशीही चर्चा रंगत आहे.

एक ते दीड हजारच्या तिकिटाला ८ हजार तर 3 हजारांच्या तिकिटाला १२ ते १५ हजार किंमत लावली जात आहे. कमाल म्हणजे ही तिकीटं घेतली जात आहेत. अशा तिकीटांच्या काळाबाजाराचे 'झी मीडिया'ने स्टिंग ऑपरेशन केले आणि हा काळाबाजार उघड केलाय.