रिपाईला तीन जागा सोडण्याची युतीची तयारी

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, October 4, 2013 - 19:53

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महायुतीतील तिसरा पार्टनर असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेच्या तीन जागा सोडण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलीय.
आठवले यांनी आज `मातोश्री`वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत ठाकरे आणि आठवले यांच्यामध्ये चर्चा झाली. आठवले यांनी यावेळी लोकसभेच्या सहा जागांची मागणी केली होती. पण त्यापैकी केवळ तीन जागा सोडण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी दाखवलीय.

यावेळी, राज्यसभेची जागा भाजपकडून घ्या, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी रामदास आठवले यांना दिल्याचं समजतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Friday, October 4, 2013 - 19:38


comments powered by Disqus