वेगळ्या विदर्भाचे विधानपरिषदेत तीव्र पडसाद, राणे-मुंडे आक्रमक

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली.

Updated: Jul 29, 2016, 05:01 PM IST
वेगळ्या विदर्भाचे विधानपरिषदेत तीव्र पडसाद, राणे-मुंडे आक्रमक title=

 मुंबई : वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर विधानपरिषदेतले विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट करण द्यावे, अशी मागणी केली. त्याचवेळी आपली भूमिका काय आहे, हेही जनतेला समजू दे, असे ते म्हणालेत.

अखंड महाराष्ट्रासाठी विरोधक आक्रमक झाले. विधानसभा आणि विधानपरिषदेत यामु्द्यावरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केली. वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव भाजप खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत मांडला.  त्यावर राज्यातल्या सरकारची नक्की काय भूमिका आहे, याबाबत सरकारने निवेदन करावे, अशी विधान परिषदेत विरोधकांची मागणी होती.

शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी देखील चर्चेची मागणी केली आहे. याविषयावर सत्ताधऱ्यांपैकी कुणी उठून उत्तर देणार का? असा टोमणा नारायण राणेंनी मारल्यावर गिरीश बापटांनी बैठक घेऊन चर्चा कधी करायची हे ठरवू ,असे उत्तर दिले. पण त्यामुळे विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यांनी वेलमध्ये येऊन सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

विधानपरिषदेत कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.  विधान परिषदेतही यामुद्द्यावरून गदारोळ झाला. वेलमध्ये आलेल्या भाजपचे आमदार वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देत होते. त्यामुळे संतापलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते आमदारांवर धावून गेले.