पोलीस ठाण्यातच तरुणावर पोलीस निरीक्षकाचा लैंगिक अत्याचार ?

मुंबईमधील चुनाभट्टीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पोलीस ठाण्यात घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एका पोलीस निरीक्षकाने एका तरुणाचे लैंगिक शोषण केले. हे सर्व करण्यासाठी या पोलीस निरीक्षकाने महिलेचा वेष परीधान केला होता. या छळाप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 24, 2014, 03:39 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
मुंबईमधील चुनाभट्टीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पोलीस ठाण्यात घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एका पोलीस निरीक्षकाने एका तरुणाचे लैंगिक शोषण केले. हे सर्व करण्यासाठी या पोलीस निरीक्षकाने महिलेचा वेष परीधान केला होता. या छळाप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्याचे समजते.
चुनाभट्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाविरोधात एका तरुणाने लैंगिक शोषणचा आरोप केलाय. पिडीत तरुण हा चुनाभट्टी परिसरातच राहतो. २०११ मध्ये पिडीत तरुणाच्या चुलत भावाविरोधात तक्रार दाखल झाली होती. यासंदर्भात पिडीत तरुण चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गेला होता, असे एका इंग्रजी वृत्तपक्षाने म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांने पिडीत तरुणाचे नाव आरोपींच्या यादीत टाकण्याची आणि गुन्हा नको असे असेल तर माझ्या सांगण्यानुसार तातडीने पोलीस ठाण्यात हजर व्हावे, अशी धमकी दिली. यानंतर या पोलीस निरीक्षकांने पिडीत तरुणाला सातत्याने पोलीस ठाण्यात बोलवून कॅबिनमध्येच लैंगिक अत्याचार केला, असा आरोप या तरुणाने केला आहे.
यासंदर्भात पिडीत तरुणाने कोर्टातही याचिका दाखल केली होती. कोर्टात १६ जानेवारी रोजी सुनावणीही झाली. यानंतर चुनाभट्टी पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, लवकरच त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
संबंधित अधिकारी महिलांचे कपडे घालून मेक-अपही करायचा. गाणी लावून तो जबरदस्तीने तरुणासोबत नृत्य करायचा. याप्रकाराने भयभीत झालेल्या पिडीत तरुणाने त्याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र हा प्रकार असह्य झाल्याने त्याने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने कोर्टात धाव घेतली. त्यानंतर भांडाफोड झाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.