शरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शऱद पवार यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी झी २४ तासच्या  रोखठोक मुलाखतीत केलाय. महायुतीनं दोन अंकी जागा दिल्या नाहीत  तर पर्याय खुला असल्याचा सूचक इशाराही त्यांनी भाजप-शिवसेनेच्या  नेत्यांना दिलाय. 

Updated: Sep 17, 2014, 02:42 PM IST
शरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शऱद पवार यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी झी २४ तासच्या  रोखठोक मुलाखतीत केलाय. महायुतीनं दोन अंकी जागा दिल्या नाहीत  तर पर्याय खुला असल्याचा सूचक इशाराही त्यांनी भाजप-शिवसेनेच्या  नेत्यांना दिलाय.

 

झी २४ तासच्या 'रोखठोक रामदास आठवले'  या कार्यक्रमात सध्याच्या राजकीय परिस्थितीतवर रोखठोक मतं व्यक्त केली. लोकसभेतल्या विजयाला मोदी लाटेसह इतरही लाटा कारणीभूत असल्याचं आठवले म्हणालेत. शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले तर आघाडीचा सत्तेचा मार्ग सुकर होईल, असंही आठवलेंनी स्पष्ट केलंय.

शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे सांगताना आठवले म्हणाले, अजूनही आमचा संपर्क आहे. त्यांना मी म्हटलो १५ वर्षे मी तुमचा अनुभव घेतला आता महायुतीचा अनुभव घेत आहे. त्यामुळे मी काही तुमच्या सोबत येणार नाही.

महायुती शाबूत ठेवण्यासाठी रिपाइं कायम प्रयत्न करीत आहे. दोघांनी एकत्र लढले तर आता हाता तोंडाशी घास आला आहे. युती तुटली तर तो घास खाता येणार नाही. त्यामुळे युती कायम राहावी हा रिपाइंचा आग्रह आहे.
कालच उद्धव ठाकरे यांच्याशी रामदास आठवले अनेक दिवसांनंतर भेटले, या बैठकीबद्दल बोलताना सांगितले की, मी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला की, भाजपच्या मागणीनुसार जागा न सोडता आणखी काही चार पाच जागा सोडल्या तर युती अभेद्य राहील आणि महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येईल. 

युती तुटली तर रामदास आठवले कोणाबरोबर जाणार या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले, प्रथम महायुती तुटणार नाही. मी युती तुटू देणार नाही. आणि जर कधी युती तुटली तर जे आमच्या सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ. ज्यांना आमचे विचार पटतील त्यांच्या सोबत जाऊ असे रामदास आठवलेंनी गोलमोल  उत्तर दिले. 

राखी सावंतमुळे तरुणांची संख्या वाढली
राखी सावंत पक्षात आल्याने महिला नाराज आहेत. या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले, महिला जरी नाराज असल्या तरी तरुणांची संख्या पक्षात वाढली आहे. रिपाइंमध्ये राखी सावंत आल्याने चर्चा वाढली आहे हे रामदास आठवले यांनी मान्य केले. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.