गुरमेहर कौर वादात शरद पवारांची उडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गुरमेहर कौर वादात उडी घेतलीय. त्यांनी या प्रकरणावरुन भाजपवर टीका केलीये.

Updated: Mar 2, 2017, 03:18 PM IST
गुरमेहर कौर वादात शरद पवारांची उडी title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गुरमेहर कौर वादात उडी घेतलीय. त्यांनी या प्रकरणावरुन भाजपवर टीका केलीये.

सध्या देशात दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राजकीय नेत्यांकडून समाजात कटूता वाढवण्याचे काम होत असल्याचं पवार म्हणालेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी संघटना याविरोधात आवाज उचलणार असल्याचं पवारांनी सांगितलंय. 

कारगिल युद्धातील शहीद मनदीप सिंग यांची मुलगी गुरमेहर कौर हिच्या एका व्हिडिओवरून गेल्या काही दिवसांपासून बराच वाद सुरु आहे. 'मी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिकते... मी एबीव्हीपीला घाबरत नाही. मी एकटी नाही... भारताचा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे #StudentAgainstABVP' असं ट्विट गुरमेहर कौरनं केलं होतं.

या ट्विटनंतर सोशल मीडियावर गुरमेहरला बलात्काराची धमकीही मिळाली. तसेच तिचा जुना व्हिडीओ पुन्हा समोर आलाय.