शरद पवारांची प्रकृती स्थिर, पायावर शस्त्रक्रिया होणार

दिल्लीतील निवासस्थानी काल संध्याकाळी शरद पवार यांना ठेच लागल्याने ते पडले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल आहे. त्यांच्या पायावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांना सात दिवस ब्रीच कॅंडी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Updated: Dec 3, 2014, 08:26 PM IST
शरद पवारांची प्रकृती स्थिर, पायावर शस्त्रक्रिया होणार   title=

मुंबई : दिल्लीतील निवासस्थानी काल संध्याकाळी शरद पवार यांना ठेच लागल्याने ते पडले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल आहे. त्यांच्या पायावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांना सात दिवस ब्रीच कॅंडी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दिल्लीतील निवासस्थानी पाय घसरून पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. हे वृत्त समजताच राष्ट्रवादीमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्यांच्या हातालाही किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पवारांसोबत ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची पत्नी प्रतिभा आणि कन्या सुप्रिया सुळे आहेत.

तर पुतणे अजित पवार राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा रद्द करून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. याशिवाय, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हेदेखील पवारांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.