सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग, पवारांचा मोदींवर थेट हल्ला

‘पंतप्रधानपदासाठी काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. स्वतःच्या सत्तेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे’ अशी थेट टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केलीय.

शुभांगी पालवे | Updated: Sep 21, 2013, 06:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘पंतप्रधानपदासाठी काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. स्वतःच्या सत्तेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे’ अशी थेट टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केलीय.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या श्रमजिवी मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना थेट टार्गेट केलं. पण, यावेळी त्यांनी वाजपेयींची स्तुती केली मात्र मोदींना बोल सुनावले.

दरम्यान, पवारांनी दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाबाबतही वक्तव्य केलं. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. मात्र तपासाबाबत पोलिसांना तपासासाठी योग्य वेळ देणं गरजेचं आहे, नाहीतर मालेगावासारखी परिस्थिती उदभवू शकते असं पवार म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.