शीना बोरा हत्याकांड : महानाट्यातले सगळे 'कॅरेक्टर्स' मुंबईत!

एखाद्या फिल्मची कहाणी शोभावी अशा शीना बोरा हत्याकांडाच्या महानाट्यामधले सर्व 'कॅरेक्टर्स' आज मुंबईत येतायत.

Updated: Aug 28, 2015, 09:52 AM IST
शीना बोरा हत्याकांड : महानाट्यातले सगळे 'कॅरेक्टर्स' मुंबईत! title=

मुंबई : एखाद्या फिल्मची कहाणी शोभावी अशा शीना बोरा हत्याकांडाच्या महानाट्यामधले सर्व 'कॅरेक्टर्स' आज मुंबईत येतायत.

इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर शाम राय अटकेत आहेत. इंद्राणीचे पती मीडिया टायकून पीटर मुखर्जीही मुंबईतच आहेत. या तिघांची पोलिसांनी चौकशीही केलीय. शीनाचा लिव्ह इन पार्टनर आणि पीटर मुखर्जी यांचा मुलगा (पहिल्या पत्नीपासून)  राहुल मुखर्जीदेखील आज पहाटेच खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालाय. त्याच्यासह पीटर मुखर्जींचीही आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.  

आता शीनाचा सख्खा भाऊ मिखाईल आणि या हत्येच्या कटात सक्रीय सहभागी असलेला इंद्राणीचा क्रमांक दोनचा पती संजीव खन्ना यांना कोलकात्याहून मुंबईत आणलं जातंय. आता इंद्राणी, ड्रायव्हर आणि खन्ना या तिघांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

नेमकी का झाली शीनाची हत्या?
शीना बोराच्या हत्येमागचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी त्याच्या अनेक थिअरीज आहेत. मात्र, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येमागे काळा पैसा हे मोठं कारण असण्याची शक्यता आहे. 

२००७ साली इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या नाईन एक्स मीडिया या कंपनीतला हिस्सा विकल्यानंतर आलेला बराच पैसा इंद्राणीनं शीनाच्या खात्यात टाकला होता. शीनानं हा पैसा नंतर परत करण्यास नकार दिल्यामुळेच तिचा काटा काढण्यात आल्याचं पोलीस मानतायत.

अधिक वाचा : शीना बोरा हत्याकांड आत्तापर्यंत... 

कंपनी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भ्रष्टाचार चौकशी कार्यालयानं न्यूज एक्स वाहिनीमधल्या विक्रीत झालेल्या छुप्या व्यवहाराची चौकशी सुरू केली होती. हाच पैसा इंद्राणीनं शीनाच्या खात्यात 'पार्क' केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.