शिवसैनिकांकडून नाथाभाऊंना मोबाईल गिफ्ट

शिवसैनिकांनी एकनाथ खडसे यांना एक मोबाईल भेट दिला आहे, सांताक्रुझ पोस्ट ऑफिसने हा मोबाईल खडसेंना पाठवण्यात आला आहे. 

Updated: Nov 25, 2014, 01:28 PM IST
शिवसैनिकांकडून नाथाभाऊंना मोबाईल गिफ्ट title=

मुंबई : शिवसैनिकांनी एकनाथ खडसे यांना एक मोबाईल भेट दिला आहे, सांताक्रुझ पोस्ट ऑफिसने हा मोबाईल खडसेंना पाठवण्यात आला आहे. 

मायक्रोमॅक्स कंपनीचा हा मोबाईल खडसेंना लवकरच पोस्टाने मिळणार असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे.

जितेंद्र जनावळे या शिवसैनिकाने हा मोबाईल पाठवला आहे. खडसेंनी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केल्यावरून हा मोबाईल त्यांना गिफ्ट पाठवण्यात आलाय.

एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं जे वक्तव्य केलं, ते त्यांना चांगलंच अडचणीच ठरतंय. यावर शिवसेना अधिक आक्रमक झालेली आहे. 

शेतकऱ्यांना मोबाईल बिल भरायला पैसे आहेत, मग वीजेचं बिल का भरत नाहीत? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.