शिवसेना आक्रमक, भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा

शिवसेनेच्या काही आमदारांनी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. तर सेना नेते संजय राऊत यांनी मात्र या बातमीचा इन्कार केलाय. दरम्यान, आम्हाला शिवसेनेचे प्रतिनिधी  भेटलेत, अशी कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

Updated: Nov 8, 2014, 03:32 PM IST
शिवसेना आक्रमक, भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा title=

मुंबई : शिवसेनेच्या काही आमदारांनी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. तर सेना नेते संजय राऊत यांनी मात्र या बातमीचा इन्कार केलाय. दरम्यान, आम्हाला शिवसेनेचे प्रतिनिधी  भेटलेत, अशी कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

भाजपकडून शिवसेनेला राज्यात मंत्रिमंडळातल्या सहभागाबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाराजी आहे. त्यामुळे आमदारांच्या शपथविधी आणि विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपला विधीमंडळात अडचणीत आणण्याची व्यूहरचना शिवसेना आखतेय.

या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि अर्जुन खोतकर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी शिवसेना भाजपची कोंडी करु शकतं.

माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे केलं जात असलं तरी काँग्रेसकडून त्यांना होणारा विरोध लक्षात घेत शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचं नाव सर्वसहमतीनं पुढे आणलं जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.