शोभा डे यांच्या विरोधात हक्कभंग

 मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्राइम टाइम मिळण्याबाबत सक्ती करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्विटरवरून केलेल्या टीकेचे पडसाद आज विधानसभेत पडले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सरकारवर टीका केल्या प्रकरणी शोभा डे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. 

Updated: Apr 8, 2015, 02:38 PM IST
शोभा डे यांच्या विरोधात हक्कभंग title=

मुंबई :  मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्राइम टाइम मिळण्याबाबत सक्ती करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्विटरवरून केलेल्या टीकेचे पडसाद आज विधानसभेत पडले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सरकारवर टीका केल्या प्रकरणी शोभा डे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. 

मराठी सिनेमा प्राइम टाइममध्ये दाखवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची शोभा डेनं खिल्ली उडवली होती. त्यावरून हा हक्कभंग दाखल करण्यात आलाय...

शोभा डे यांनी काल काय ट्विट केलं होतं पाहा...

१) ही तर 'दादागिरी'....
देवेंद्र (डिक्टेटवाला) फडणवीस
यांनी पुन्हा एकदा करून
दाखवलं. आधी बीफबंदी,
आता सिनेमाबंदी...

२) आम्ही ज्या महाराष्ट्रावर प्रेम
करतो, तो हा महाराष्ट्र नाही.
नको, नको... ये सब रोको !

३) मला मराठी सिनेमा आवडतो.
तो कधी, कुठे बघायचा ते
मला ठरवू द्या, देवेंद्रजी...

४) ही तर निव्वळ दादागिरी
झाली...

५) मुंबईत मल्टिप्लेक्समध्ये
पॉपकॉर्न मिळणार नाहीत?
फक्त दही मिसळ आणि
वडापाव मिळणार.

आणि हक्कभंगाच्या नोटिशीनंतर काय प्रतिक्रिया 

हक्कभंग कशासाठी?

१) आता मी माफी मागावी
यासाठी हक्कभंग?

२) कम ऑन! मला महाराष्ट्रीय
असल्याचा अभिमान आहे...

३) आणि मला मराठी चित्रपट
आवडतात... नेहमी आवडतील

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.