शिवसेनेचे आमदार नाराज, उद्धव यांनी बोलावली प्रतोदांची तातडीची बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधीमंडळ प्रतोदांची तातडीची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी पाच वाजता शिवालयात  ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

Updated: Jul 21, 2016, 02:39 PM IST
शिवसेनेचे आमदार नाराज, उद्धव यांनी बोलावली प्रतोदांची तातडीची बैठक  title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधीमंडळ प्रतोदांची तातडीची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी पाच वाजता शिवालयात  ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

सरकारमध्ये असूनही कामं होत नसल्यामुळे शिवसेना आमदार भाजवर नाराज आहेत. यासंदर्भात शिवसेना आमदारांनी  काल मंत्र्यालयात ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट त्यांच्या दालनात घेऊन याबाबतचा असंतोष व्यक्त केला होता. याची दखल घेत उद्धव ठाकरेंनी प्रतोदांची बैठक बोलावली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भेटीत दोन वर्षे सत्तेत असूनही शिवसेना आमदारांना सत्तेत असल्यासारखे वाटत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांना जास्त निधी दिला जातो, मात्र शिवसेना आमदारांची कामे होत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.