'पाय जमिनीवर ठेवा, नाहीतर जनता उलटे सुलटे सालटे काढेल'

 शिवसेनेचे मुखपत्र सामानामधील अग्रलेखात भाजपला इशारा देण्यात आला आहे. याधीच शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून धुसपूस सुरू आहे. 

Updated: Sep 17, 2014, 03:01 PM IST
'पाय जमिनीवर ठेवा, नाहीतर जनता उलटे सुलटे सालटे काढेल' title=

मुंबई :  शिवसेनेचे मुखपत्र सामानामधील अग्रलेखात भाजपला इशारा देण्यात आला आहे. याधीच शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून धुसपूस सुरू आहे. 

पोटनिवडणुकीत मोदी लाट ओसरल्याची चर्चा सुरू झालीय, यावर सामानाच्या अग्रलेखात म्हटलंय, "आता पाय जमिनीवर ठेवा. पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे, तो सगळ्यांसाठीच आहे. जनतेला गृहीत धरू नका. पाय जमिनीवर ठेवा, विजयाचा उन्माद चढू देऊ नका आणि हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका. हा धडा जे घेतील तेच महाराष्ट्र काबीज करतील. नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटे काढेल", असं म्हटलंय.

भाजपला उत्तरप्रदेश, राजस्थान आणि गुजरात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. भाजपकडे याआधी २३ जागा होत्या, त्यापैकी त्यांना फक्त १३ जागांवर विजय मिळाला आहे. राजस्थान आणि गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आश्चर्यकारक प्रदर्शन केलं आहे.

सामनाच्या संपादकीयमध्ये आलेला हा इशारा, भाजपसाठीच असल्याचं म्हटलं जातंय, कारण विधानसभेसाठी भाजपने शिवसेनेचा फॉर्म्युला मानावा, कुठंतरी दबाव निर्माण व्हावा, भाजपचाच दबदबा नाहीतर शिवसेनेचीही हवा आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.