शिवसेनेची मातोश्रीवर बैठक, युतीच्या निर्णयाकडे लक्ष

भाजपानं दिलेल्या जागावाटपाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक होतेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या या बैठकीला पक्षाचे तमाम नेते हजर राहणार आहेत. 

Updated: Sep 18, 2014, 06:49 PM IST
शिवसेनेची मातोश्रीवर बैठक, युतीच्या निर्णयाकडे लक्ष title=

मुंबई : भाजपानं दिलेल्या जागावाटपाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक होतेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या या बैठकीला पक्षाचे तमाम नेते हजर राहणार आहेत. 

भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी काल याबाबतचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडे सोपवला होता. आज संध्याकाळी होणा-या या बैठकीत या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. 

शिवसेना भाजपने आपल्या जागावाटपाचा तोडगा लवकरात लवकर मिटवावा असा सल्ला राजू शेट्टी यांनी दिलाय. हवं तर घटकपक्षांच्या ६३ जागामधल्या जागा घ्या पण लवकरात लवकर तोडगा काढा, असं मत राजू शेट्टींनी मांडलंय. 

मात्र येत्या दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर या ६३ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.