शिवसेनेचे संभाव्य मंत्री, सेनेला ही हवीत मंत्रिपदे

शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावं, यासाठी उद्यापासून पुन्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू होणार आहे. उद्या प्रामुख्यानं तीन खात्यांवर चर्चा सुरू होणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपद नाही तर गृहमंत्रीपद, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा खाती शिवसेनेला हवीच आहेत.

Updated: Nov 27, 2014, 09:03 PM IST
शिवसेनेचे संभाव्य मंत्री, सेनेला ही हवीत मंत्रिपदे title=

मुंबई : शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावं, यासाठी उद्यापासून पुन्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू होणार आहे. उद्या प्रामुख्यानं तीन खात्यांवर चर्चा सुरू होणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपद नाही तर गृहमंत्रीपद, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा खाती शिवसेनेला हवीच आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या चर्चेत जातीनं लक्ष घालणार आहेत, मात्र उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदाबाबत शिवसेना आग्रही असून, भाजप ही दोन्ही पदे शिवसेनेला देण्यास अनुत्सुक आहे. त्यामुळे आता तरी  हा तिढा सुटणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. 

भाजपच्या वतीनं ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील हे शिवसेनेशी चर्चा करतील. तर शिवसेनेतर्फे अनिल देसाई हे चर्चा करणार आहेत. धर्मेंद्र प्रधान उद्या मुंबईत आल्यानंतर ही चर्चा सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी याबाबत माहिती दिली. मात्र राज्यपालांच्या भेटीनंतर याबाबत बोलण्याचे उद्धव ठाकरेंनी टाळले.   

शिवसेनेचे संभाव्य मंत्री
> एकनाथ शिंदे
दिवाकर रावते
निलम गोऱ्हे
रामदास कदम
विजय शिवतारे
शंभुराज देसाई किंवा राजेश क्षीरसागर
गुलाबराव पाटील
संजय राठोड
अर्जुन खोतकर
रवींद्र वायकर किंवा सुनील प्रभू
राजन साळवी किंवा उदय सामंत

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले तरच सत्ते सहभागी होऊ, अशी ताठर भूमिका राष्ट्रीय समाज

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.