शिवसैनिकांचा सुधींद्र कुलकर्णींच्या कार्यक्रमात गोंधळ

भारत-पाक संबंधांचे अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी पुन्हा धुडगूस घातला. कराची फ्रेंडशिप फोरमतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

Updated: Jun 28, 2016, 09:07 PM IST
शिवसैनिकांचा सुधींद्र कुलकर्णींच्या कार्यक्रमात गोंधळ  title=

मुंबई : भारत-पाक संबंधांचे अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी पुन्हा धुडगूस घातला. कराची फ्रेंडशिप फोरमतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

या ही पत्रकार परिषद सुरू असताना शिवसैनिकांनी गोंधळ घातला. भारत आणि पाकिस्तानच्या छायाचित्रकरांशी संवाद साधण्यासाठी सुधींद्र कुलकर्णी यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं. 

मात्र  काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

सुधींद्र कुलकर्णी हे कार्यक्रमातून बाहेर जाताना शिवसैनिकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र पोलिसांनी या शिवसैनिकांना ताब्यात घेतले.