शिवसेना विरोधात मतदान करणार, औटींचा अर्ज मागे घेण्याची शक्यता

शिवसेना भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करणार असल्याचं, शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं आहे. 

Updated: Nov 12, 2014, 10:33 AM IST
शिवसेना विरोधात मतदान करणार, औटींचा अर्ज मागे घेण्याची शक्यता title=

मुंबई : शिवसेना भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करणार असल्याचं, शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं आहे. 

शिवसेना विरोधात बसणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय, पण काही क्षणातच विधानसभा अध्यक्षपदासाठी असलेले शिवसेनेचे उमेदवार विजय औटी हे अर्ज मागे घेणार आहेत, अशी शक्यता सुत्रांनी दिली आहे, अर्ज मागे घेण्याची मुदत सकाळी १० पर्यंत आहे. 

दुसरीकडे वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसकडून तर भाजपकडून हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक ठराव दुपारी तीन वाजता मांडला जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.