शिवसेनेची ही पोस्टर्स मुंबईच्या नाक्यांवर झळकतायेत!

मुंबई महापालिकेत शिवसेनेनं जाहिरातींसाठी आता इंग्रजीचा आधार घेतला आहे. विरोधकांना शह देण्यासाठी आणि आपल्या विकास कामांचा लोकांना परिचय व्हावा यासाठी सेनेची पोस्टर्स नाक्यांवर झळकतायेत!

Updated: Jan 14, 2017, 04:41 PM IST
शिवसेनेची ही पोस्टर्स मुंबईच्या नाक्यांवर झळकतायेत! title=

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेनं जाहिरातींसाठी आता इंग्रजीचा आधार घेतला आहे. विरोधकांना शह देण्यासाठी आणि आपल्या विकास कामांचा लोकांना परिचय व्हावा यासाठी सेनेची पोस्टर्स नाक्यांवर झळकतायेत!

'करुन दाखवलं' आणि 'माझं नावं शिवसेना' या कॅचलाईननंतर आता 'डीड यू नो'  असा प्रश्न मतदारांना विचारत महापालिकेत काय-काय कामं केली, याची जाहिरात शिवसेनेनं केलीये. पक्षाच्या जाहिरातीचा पहिला टप्पा आज मुंबईकरांपुढे आला. ही पोस्टर्स मुंबईच्या नाक्यांवर झळकायला लागले आहेत.