शिवडी ते एलिफंटा रोप-वे सेवेबाबत हालचाली

शिवडी ते जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटादरम्यान रोप-वे सेवा सुरु करण्याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टने हालचाली सुरु केल्यात.

Updated: Apr 26, 2017, 05:43 PM IST
शिवडी ते एलिफंटा रोप-वे सेवेबाबत हालचाली title=

मुंबई : शिवडी ते जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटादरम्यान रोप-वे सेवा सुरु करण्याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टने हालचाली सुरु केल्यात. या प्रकल्पांसाठी पोर्ट ट्रस्ट जागतीक निविदा मागवणार आहे.

या निविदा प्रक्रियेत भाग घेणा-या इच्छुक कंपन्याबरोबर प्राथमिक चर्चा मुंबई पोर्ट ट्रस्टनं संबंधित कंपन्यांशी केली. प्रदुषण मुक्त आणि पर्यावरणाची हानी होणार नाही अशा पद्धतीची ही रोप-वे सेवा ही भारतातील सर्वात मोठी रोप-वे सेवा म्हणून भविष्यात ओळखली जाणार आहे.

शिवडी ते एलिफंटा दरम्यान रोप वे सेवा 

 मुंबई पोर्ट ट्रस्ट सुरु करणार शिवडी - एलिफंटा बेटा दरम्यान रोप वे सेवा 

8 किमीचा रोप वे चा मार्ग समुद्रावरुन असेल

हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा रोप वे चा मार्ग ठरणार

रोप वे च्या माध्यमातून फक्त 14 मिनीटांत हे अंतर पार होईल

रोप वे च्या एका ट्रॉलीमधून 30 व्यक्ति प्रवास करु शकतील

दर तासाला सुमारे 4 हजार पर्यंटक वाहुन नेण्याची रोप वे ची क्षमता असेल

रोप वे सेवा मुळे 12 ही महिने एलिफंटाला भेट देणे शक्य होणार

प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी 4 वर्षे लागणार