शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक

दिल्लीत उद्या सुरू होणा-या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधकांसह मित्रपक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक घेतली. या बैठकीत नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरील भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.

Updated: Nov 15, 2016, 05:58 PM IST
शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक  title=

मुंबई : दिल्लीत उद्या सुरू होणा-या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधकांसह मित्रपक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक घेतली. या बैठकीत नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरील भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.

काळा पैशांच्या मुद्दयावर शिवसेना पंतप्रधानांसोबत आहे. मात्र जनतेच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच या मुद्यावर अनेक पक्षांचे नेते उद्धव ठाकरेंशी चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती राऊत यांनी दिली. त्यामुळं अधिवेशनात शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय.