वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत सेनेकडून तृप्ती सावंतांना उमेदवारी

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेतर्फे बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तृप्ती सावंत यांना उमेदवारी देत निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आलं आहे.  

Updated: Mar 19, 2015, 04:11 PM IST
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत सेनेकडून तृप्ती सावंतांना उमेदवारी title=

मुंबई : वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेतर्फे बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तृप्ती सावंत यांना उमेदवारी देत निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आलं आहे.  

शिवसेनेचे बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय.  ही लढत लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे. त्यामुळे, आता काँग्रेस, आणि राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्षं लागलेलंय.  

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षानं मात्र आधीच आपण वांद्रे पूर्व आणि तासगाव विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.